Top News

इम्मानुएल चर्चचा ७९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

 पुणे, प्रतिनिधी : गुरुवार पेठ, मोमीनपुरा येथील इम्मानुएल चर्चचा ७९ वा वर्धापन दिन भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भक्तिगीते, विशेष उपासना आणि प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

या प्रसंगी वर्धापन दिनानिमित्त केक कापून सामूहिक प्रार्थना करण्यात आली. दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उपस्थित डॉक्टर आणि मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमात पुणे धर्मप्रांताचे बिशप रा. रेव्ह. अल्फ्रेड सी. तिवडे यांनी पवित्र शास्त्रातील वचनांवर आधारित प्रेरणादायी संदेश देत श्रद्धा, सेवा आणि समाजहिताच्या कार्याचा वारसा जपण्याचे आवाहन केले.

यावेळी इम्मानुएल चर्चचे प्रमुख रेव्ह. विजय म्हंकाळे, चर्चचे सचिव किशोरी पाटोळे, तसेच चर्च कमिटीचे सदस्य आणि मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर पुणे शहरातून आलेल्या ख्रिस्ती बांधवांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार प




डला.

Post a Comment

أحدث أقدم
Media World News

भारत की बेटी पुरस्कार

Bharat ki Beti Award 2026

🎧 LIVE FM RADIO




🔊 Volume