पुणे: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात आगमन झालेल्या वारकरी भाविकांसाठी सुभद्रा सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने नाना पेठ येथे दोन दिवस मोफत सलून सेवेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात वारकऱ्यांना मोफत दाढी व केस कापण्याची सेवा उपलब्ध करून देण्यात आली. या सेवेचा शेकडो वारकरी भाविकांनी लाभ घेतला.
सुभद्रा सामाजिक सेवा संस्था गेल्या दहा वर्षांपासून पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी संप्रदायासाठी ही मोफत सलून सेवा सातत्याने राबवत असून, वारकऱ्यांच्या सेवेसाठी हा उपक्रम समाजोपयोगी ठरत असल्याची माहिती सलून सेवेकरी नितीन बालकी यांनी दिली.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विलास लोंढे, अध्यक्ष नितीन बालकी, इरफान सय्यद, शोएब शेख, विशाल आंदे, राजू फुलपाखर, प्रवीण फुलपगार, नासिर पठाण, जीवन गणपुरे, रत्नाकर खोब्रागडे, अंकुश बालकी, कलावंती तूपसौंदर, ॲड. छाया गायकवाड, जाहीदा शेख, ज्योती घोगरे, जुईली धोंडे, अरुणा पाटील, राहुल शेळके, प्रशांत दासा, विनोद जैन, सागर बुरा आदी उपस्थित होते.
वारकरी संप्रदायाची सेवा हीच खरी विठ्ठल सेवा या भावनेतून सुभद्रा सामाजिक सेवा संस्था दरवर्षी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असून, यावर्षीच्या मोफत सलून सेवा उपक्रमालाही वारकरी भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


إرسال تعليق