Top News

इंडिया अगेन्स्ट करप्शनतर्फे ‘क्रिकेट रत्न पुरस्कार २०२६’ वितरण सोहळा उत्साहात संपन्न

 पुणे: इंडिया अगेन्स्ट करप्शनतर्फे आयोजित करण्यात आलेला ‘क्रिकेट रत्न पुरस्कार २०२६’चे वितरण आज पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. क्रिकेट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा यावेळी सन्मान करून त्यांना कौतुकाची थाप देण्यात आली. या कार्यक्रमाचे नेतृत्व इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केले. कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून माजी रणजी क्रिकेट पटू, महाराष्ट्र राज्य हेमंत किणीकर आणि राष्ट्रीय क्रिकेट खेळाडू अनुजा पाटील उपस्थित होते.




उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पाच खेळाडूंना यंदाचा ‘क्रिकेट रत्न पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. यामध्ये आय.पी.एल. खेळाडू पुनम खेमनर, आय पी एल खेळाडू किरण नवगीरे, आय.पी. एल खेळाडू गौतमी नाईक, महाराष्ट्र राज्य खेळाडू भक्ती मिरजकर आणि महाराष्ट्र राज्य खेळाडू आक्षया जाधव या पुरस्काराच्या मानकरी होत्या. 


कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी महिला क्रिकेटपटूंच्या वाढत्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. क्रिकेट क्षेत्रात सातत्यपूर्ण मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर यश मिळवणाऱ्या खेळाडूंना अशा पुरस्कारांमुळे अधिक प्रेरणा मिळते, असे मत यावेळी आयोजक हेमंत पाटील यांनी व्यक्त केले.


या प्रेरणादायी सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रियंका कुंभार यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, क्रीडाप्रेमी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم
Media World News

भारत की बेटी पुरस्कार

Bharat ki Beti Award 2026

🎧 LIVE FM RADIO




🔊 Volume