Top News

भूगाव येथे ‘श्री सदगुरु क्लिनिक’चा शुभारंभ

 भुगाव, पुणे : मुंबई विद्यापीठातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून आरोग्य क्षेत्रातील शासकीय अधिकारी तसेच डॉक्टर म्हणून प्रदीर्घ अनुभव असलेले डॉ. प्रसाद सुर्वे (नांदेडकर) आणि आयुर्वेदिक व पंचकर्म विशेषज्ञ डॉ. उर्मिला सुर्वे (नांदेडकर) यांच्या पुढाकारातून भूगाव येथे ‘श्री सदगुरु क्लिनिक’ या नवीन आरोग्यसेवा केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. बुधवार, दि. ९ सप्टेंबर रोजी क्लिनिकचा भव्य शुभारंभ उत्साहात पार पडला.

‘श्री सदगुरु क्लिनिक’मध्ये विविध आजारांचे निदान व उपचार करण्यासाठी प्राथमिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये संसर्गजन्य आजार, मधुमेह (शुगर), रक्तदाब (बीपी), थायरॉईड, त्वचारोग यांसह विविध आरोग्यविषयक समस्यांवर वैद्यकीय मार्गदर्शन व उपचार केले जाणार आहेत. 


तसेच आयुर्वेदिक उपचारपद्धतीमध्ये केस गळणे, लठ्ठपणा (मोटापा), महिलांच्या विविध आरोग्य समस्या, मुतखडा, अॅलर्जी यांसह अनेक समस्यांवर उपचार व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आयुर्वेदिक उपचारांसोबत पंचकर्माच्या माध्यमातूनही आवश्यक आरोग्यसेवा देण्यात येणार असल्याचे डॉ. सुर्वे यांनी सांगितले.

भुगाव तसेच परिसरातील नागरिकांना अनुभवी डॉक्टरांची वैद्यकीय सेवा आपल्या परिसरातच उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ‘श्री सदगुरु क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहे. नागरिकांनी डॉ. प्रसाद सुर्वे आणि डॉ. उर्मिला सुर्वे यांच्या वैद्यकीय अनुभवाचा व मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.


क्लिनिकच्या शुभारंभ सोहळ्याप्रसंगी नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी डॉ. सुर्वे दाम्पत्याला नवीन आरोग्यसेवेच्या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

أحدث أقدم
Media World News

भारत की बेटी पुरस्कार

Bharat ki Beti Award 2026

🎧 LIVE FM RADIO




🔊 Volume