Top News

राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) तर्फे मांजरी येथे वारकऱ्यांना १०० किलो साबुदाणा खिचडीचे वाटप

 पुणे: जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पुण्याहून पंढरपूरकडे प्रस्थान होत असताना सोलापूर रोडवरील मांजरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) यांच्या वतीने वारकरी संप्रदायासाठी सेवा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत पुणे शहर उपाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या हस्ते वारकरी भाविकांना १०० किलो साबुदाणा खिचडीचे मोफत वाटप करण्यात आले. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या हजारो वारकऱ्यांनी या सेवेचा लाभ घेतला.


यावेळी प्रवीण पवार, प्रकाश दणाणे, व्यंकटेश दणाणे, शुभम दणाणे, गणेश बडेकर, व्यंकटेश केसवाल, जमीर शेख, अल्ताफ शेख, धनंजय हिरामठ, अकबर सरोटिया, राजू सावंत, किशोर मुरमे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.


पालखी सोहळ्याच्या निमित्ताने वारकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य लाभणे ही आनंदाची बाब असून, अशा सामाजिक व सेवाभावी उपक्रमांद्वारे वारकरी संप्रदायाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न असल्याची भावना यावेळी आयोजकांनी व्यक्त केली.

Post a Comment

أحدث أقدم
Media World News

भारत की बेटी पुरस्कार

Bharat ki Beti Award 2026

🎧 LIVE FM RADIO




🔊 Volume