Top News

इक्रम खान कुटुंबाकडून वारकऱ्यांची सेवा; तिसऱ्या पिढीने जपली सर्वधर्म समभावाची परंपरा

 पुणे : आषाढी वारीनिमित्त पुण्यात दाखल होणाऱ्या वारकरी बांधवांच्या सेवेसाठी अनेक हात पुढे सरसावत असतात. त्यामध्ये येरवडा येथील गोल्फ चौकात पुणे गोल्फ क्लबचे कॅप्टन व उद्योजक इक्रम खान यांच्या कुटुंबाने गेल्या तीन पिढ्यांपासून सुरू ठेवलेली वारकऱ्यांच्या सेवेची परंपरा विशेष लक्षवेधी ठरत आहे.

इक्रम खान यांच्या पुढाकाराने गोल्फ चौक परिसरात वारकरी बांधवांसाठी भोजन, पिण्याचे पाणी, अल्पोपहार तसेच अन्य आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्यात आली. या सेवाकार्यात त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि सहकारीही उत्साहाने सहभागी झाले.

खान कुटुंबाची ही सेवाभावी परंपरा १९३२ पासून सुरू आहे. इक्रम खान यांचे आजोबा मोसा खान आणि वडील इसा खान यांनी वारकरी सेवा तसेच रामवाडी येथील राम मंदिरात साजऱ्या होणाऱ्या रामनवमी उत्सवात सातत्याने सहभाग घेत सामाजिक सलोखा जपला. त्याच परंपरेचा वारसा पुढे नेत इक्रम खान आणि त्यांचे पुत्र अहद इक्रम खान हेही विविध सेवाभावी उपक्रम राबवत आहेत.


धर्म, जात आणि पंथ यांच्या पलीकडे जाऊन मानवतेची सेवा हाच खरा धर्म असल्याचा संदेश खान कुटुंबाच्या कार्यातून समाजासमोर येत आहे. आजच्या सामाजिक परिस्थितीत सर्वधर्म समभाव, एकात्मता आणि बंधुभावाची गरज अधिक अधोरेखित होत असताना, खान कुटुंबाने जपलेली ही परंपरा समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

खान कुटुंबाच्या या सेवाभावी कार्याचे स्थानिक नागरिक, वारकरी आणि विविध सामाजिक स्तरांतून कौतुक होत असून, अशा उपक्रमांमुळे सामाजिक ऐक्य अधिक बळकट होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
Media World News

भारत की बेटी पुरस्कार

Bharat ki Beti Award 2026

🎧 LIVE FM RADIO




🔊 Volume