Top News

स्पर्धा स्कूल आयडॉल सीजन २ च्या अंतिम फेरीत पुण्यातील असामान्य तरुण प्रतिभांचे प्रदर्शन

 पुणे : स्पर्धा स्कूल ऑफ म्यूझिकने स्पर्धा स्कूल आयडॉल सीजन २ च्या अंतिम फेरीचे पुण्यातील कुमार पॅसिपिक मॉलमध्ये यशस्वी आयोजन केले. यामध्ये वाद्यवादन, गायन आणि नृत्य या तीन प्रकारांतील होतकरू कलावंतांची प्रतिभा, समर्पण आणि ध्यास जल्लोषात साजरा करण्यात आला.

स्पर्धेच्या आरंभीच्या फेऱ्यांमध्ये यशस्वी झालेले स्पर्धक या अंतिम फेरीत एकत्र आले होते. यातील प्रत्येक स्पर्धकाने पालक, संगीत रसिक आणि पाहुण्यांचा समावेश असलेल्या उत्साही प्रेक्षकांसमोर मोहक सादरीकरण केले. या कार्यक्रमाने तरुण कलाकारांना त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी एक व्यावसायिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. तसेच, त्यांना रंगमंचावरील मौल्यवान अनुभव आणि आत्मविश्वास प्राप्त करण्याची संधी मिळाली.


यावेळी सहभागींची सर्जनशीलता, तांत्रिक उत्कृष्टता आणि स्टेजवरील उपस्थितीने परीक्षक प्रभावित झाले. त्यामुळे स्पर्धा रोमांचक आणि अटीतटीची झाली. विद्यार्थ्यांची कटिबद्धता आणि त्यांचे कुटुंब व मार्गदर्शकांचे प्रोत्साहन यांचे प्रतिबिंब या सादरीकरणात पडले.

युवा प्रतिभांना प्रोत्साहन देण्याच्या कटिबद्धतेचा एक भाग म्हणून, स्पर्धा स्कूल ऑफ म्युझिकने विजेत्यांसाठी विशेष बक्षिसे आणि संधींची घोषणा केली. 


विजेत्यांची बक्षिसे आणि ऑफर्स

स्पर्धा स्कूल आयडॉल सीझन २च्या विजेत्यांना रोख बक्षिसे, शिष्यवृत्ती, ट्रॉफी आणि संधींनी सन्मानित करण्यात आले जेणेकरून त्यांच्या निरंतर कलात्मक विकासास प्रोत्साहन मिळावे.

प्रथम पारितोषिक विजेता - रोख ६००० रुपये बक्षीस, 'स्पर्धा' अभ्यासक्रमांसाठी ३० टक्के शिष्यवृत्ती (अटी व शर्ती लागू), ट्रॉफी, रेडिओ मिर्ची स्टुडिओला भेट देणे, विजेत्या सादरीकरणाचे

रेडिओ मिर्ची (केवळ गायन आणि वाद्ये) वर प्रसारण आणि 'स्पर्धा'च्या ऑनलाइन हॉल ऑफ फेममध्ये उल्लेख.

द्वितीय पारितोषिक विजेता – रोख ४००० रुपये बक्षीस, स्पर्धा अभ्यासक्रमांसाठी २५ टक्के शिष्यवृत्ती (अटी व शर्ती लागू), ट्रॉफी आणि 'स्पर्धा' ऑनलाइन हॉल ऑफ फेममध्ये उल्लेख.

तृतीय पारितोषिक विजेते – रोख २००० रुपये बक्षीस, 'स्पर्धा' अभ्यासक्रमांसाठी २५ टक्के शिष्यवृत्ती (अटी व शर्ती लागू), ट्रॉफी आणि 'स्पर्धा' ऑनलाइन हॉल ऑफ फेममध्ये उल्लेख. 


याप्रसंगी बोलताना 'स्पर्धा स्कूल ऑफ म्युझिक'चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ श्रीवास्तव म्हणाले, "तरुण कलाकारांना निकोप स्पर्धेद्वारे शिकण्याची, कला सादर करण्याची आणि वाढण्याची संधी उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे. यंदाच्या अंतिम फेरीतील उल्लेखनीय सादरीकरण हे प्रत्येक स्पर्धकाच्या मेहनत, शिस्त आणि उत्कटतेचा दाखला आहे. आम्ही सर्व अंतिम स्पर्धकांचे अभिनंदन करतो आणि हा कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या पालक, मार्गदर्शक आणि समर्थकांचे आभार मानतो."

कुमार पॅसिफिक मॉलमधील चैतन्यपूर्ण वातावरणाने या उत्साहात भर घातली. संपूर्ण कार्यक्रमात उपस्थितांनी कुटुंबीय आणि समर्थकांसह अंतिम फेरीतील स्पर्धकांचे कौतुक केले. पारितोषिक वितरण समारंभ, प्रमाणपत्रांचे वितरण आणि ग्रुप फोटो यांसह कार्यक्रमाचा समारोप झाला. यासोबतच स्पर्धेची यशस्वी सांगता झाली.


स्पर्धा स्कूल ऑफ म्युझिकने जज, प्रायोजक, स्वयंसेवक, पालक आणि कुमार पॅसिफिक मॉल यांच्या अमूल्य पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले. शाळेने दर्जेदार प्रशिक्षण, अर्थपूर्ण कामगिरीच्या संधी आणि उपक्रमांद्वारे तरुण प्रतिभेला प्रोत्साहन देऊन संगीतकार आणि नर्तकांच्या पुढील पिढीला प्रेरणा देण्याच्या कटिबद्धतेची पुष्टी केली.

Post a Comment

Previous Post Next Post
Media World News

भारत की बेटी पुरस्कार

Bharat ki Beti Award 2026

🎧 LIVE FM RADIO




🔊 Volume