Top News

‘वुमन्स एनर्जी सोशल फाउंडेशन’तर्फे महिलांसाठी विविध कलाशिक्षण उपक्रम

 पुणे : महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविण्यासोबतच त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ‘वुमन्स एनर्जी सोशल फाउंडेशन’च्या वतीने व संस्थेच्या संस्थापिका सौ. पुष्पाताई कुदळे यांच्या विशेष प्रयत्नातून पुण्यातील महिला व मुलींसाठी विविध प्रकारचे कौशल्याधारित क्लासेस व कार्यशाळा सुरू करण्यात आले आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना घरबसल्या रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात आणि त्यांच्या कलाकौशल्याला आर्थिक उत्पन्नाचे साधन मिळावे, यासाठी प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन मंगळवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी सिंहगड रोड, आनंद नगर, चरवड कॉम्प्लेक्स येथे करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या आम्रपाली पवार, व रूपालीताई मगर यांच्या सह संस्थेच्या पदाधिकारी सभासद, प्रशिक्षक व शिकाऊ महिला उपस्थित होत्या. 


या उपक्रमांतर्गत ड्रेस शिवणकाम, बेसिक पार्लर कोर्स, साडी ड्रेपिंग व साडी प्री-प्लेटिंग, आरी वर्क, जरदोजी वर्क, मशीनवरील स्वेटर निटिंग, क्रोशा स्वेटर निटिंग, हॅण्ड एम्ब्रॉयडरी, उकडीचे मोदक, मसाले बनविणे, हेल्दी सॅलड, रेडीमेड रांगोळी, कापडी तोरण, ब्लाऊज शिवणकाम, कापडी देवाचे आसन, नथ मेकिंग, फॅब्रिक पेंटिंग, गौरी साडी ड्रेपिंग तसेच जुन्या हिंदी गाण्यांवर झुंबा अशा विविध प्रशिक्षणांचा समावेश आहे. महिलांनी पारंपरिक कलांसोबत आधुनिक कौशल्ये आत्मसात करून स्वतःच्या पायावर उभे राहावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळत आहे.


या उपक्रमाचे आयोजन सौ. पुष्पाताई कुदळे, संस्थापिका व अध्यक्ष, वुमन्स एनर्जी फाउंडेशन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून. उपक्रमासाठी सौ. कुंदा रविंद्र चरवड यांचे विशेष सहाय्य लाभले. तसेच कार्यकारिणीमध्ये वीणा सचिन कडू, राजश्री गजानन नाईक, मेघा समीर कडू, आणि सुशीला उत्तम इचके यांचा सहभाग होता.

महिला व मुलींनी या उपक्रमाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा तसेच प्रशिक्षणासाठी प्रवेश व अधिक माहितीसाठी 9689418434 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
Media World News

भारत की बेटी पुरस्कार

Bharat ki Beti Award 2026

🎧 LIVE FM RADIO




🔊 Volume