पुणे,७ ऑगस्ट २०२६ : स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला अधिक बळ देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याच्या उद्देशाने रेकिट (Reckitt) आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेज ऑफ इंडिया (ASCI) यांनी 'सेफर चॅलेंज' (सॅनिटेशन वर्कर असिस्टंस फॉर फॅटॅलिटी एलिमिनेशन अँड रिस्क रिडक्शन) ही स्पर्धा सुरू केली आहे. हे अशा प्रकारचे पहिलेच नाविन्यपूर्णतेचे राष्ट्रीय आव्हान आहे. यामध्ये स्टार्टअप्स, अभियंते, संशोधक, शैक्षणिक संस्था आणि तंत्रज्ञान इनोव्हेटर्सना गटार आणि सेप्टिक टँक साफसफाईच्या कामांदरम्यान सुरक्षा सुधारण्यासाठी मदत करणारी परवडणारी, परिधान करण्यायोग्य वायूशोधक उपकरणे विकसित करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
हा उपक्रम रेकिटच्या 'हार्पिक वर्ल्ड टॉयलेट कॉलेज' अंतर्गत सुरू करण्यात आला आहे. 'स्वच्छतेमुळे होणारे मृत्यू शून्य करण्याच्या दिशेने आराखडा' यासाठीची कटिबद्धता त्यात अधोरेखित करण्यात आली आहे. व्यावहारिक आणि विस्तारक्षम तांत्रिक उपायांना प्रोत्साहन देऊन धोकादायक वायू शोधण्याची क्षमता नावीन्यपूर्णतेद्वारे वाढवणे, व्यावसायिक धोके कमी करणे आणि अधिक सुरक्षित स्वच्छता पद्धतींना चालना देणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे.
भारतात स्वच्छतेची पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यात येत आहे. अशा वेळेस स्वच्छता कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करणे हे तितकेच महत्त्वाचे आव्हान आहे. विषारी वायू आणि ऑक्सिजनची कमतरता असलेल्या वातावरणाच्या संपर्कात येणे हे मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. कामगारांची सुरक्षा अधिक मजबूत करतील आणि त्याच वेळी भारताच्या अधिक सुरक्षित व अधिक यांत्रिकीकृत स्वच्छता प्रणालींच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांना पूरक ठरतील, अशा नवकल्पनांना 'सेफर चॅलेंज'च्या माध्यमातून प्रोत्साहन देणे हा रेकिट आणि एएससीआय यांचा उद्देश आहे.
धोकादायक वायूंचा रिअल-टाइममध्ये शोध घेण्यास सक्षम असलेले वापरता येण्याजोगे तंत्रज्ञान विकसित करण्याकरिता संपूर्ण भारतातील स्टार्टअप्स, वैयक्तिक अभियंते, डिझाइनर्स आणि इनोव्हेटर्ससाठी अर्ज आता खुले झाले आहेत. जी उत्पादने परवडणारी आहेत, प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात वापरण्यास सोपी आहेत आणि स्वच्छतेच्या कामांदरम्यान वेळेवर हस्तक्षेप करण्यास साहाय्य करणारे असतील, अशा उपायांचा या स्पर्धेत शोध घेतला जात आहे. हा उपक्रम भारत सरकारच्या 'विकसित भारत २०४७' या संकल्पनेशी सुसंगत असून, 'स्वच्छ भारत मिशन २.०', 'नमस्ते' आणि 'सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज' यांसारख्या कार्यक्रमांना पूरक आहे.
या शुभारंभप्रसंगी बोलताना रवी भटनागर, कम्युनिकेशन्स अँड कॉर्पोरेट अफेअर्स डायरेक्टर, दक्षिण आशिया, एमईएनएआरपी (MENARP) आणि आफ्रिका म्हणाले, “शौचालयांची उपलब्धता वाढवण्यात भारताने लक्षणीय प्रगती केली आहे; पुढील टप्प्यात स्वच्छता अधिक सुरक्षित, कार्यक्षम आणि शाश्वत बनवण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. रेकिटमध्ये नेहमी योग्य तेच करणे हा आमच्या कार्यपद्धतीचा गाभा आहे. त्यामुळे आमच्या कृतींचा समाजावर दीर्घकाळ टिकणारा सकारात्मक परिणाम होईल याची आम्ही सुनिश्चिती करतो. हार्पिक वर्ल्ड टॉयलेट कॉलेजच्या माध्यमातून, आम्ही स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी कौशल्ये निर्माण करून आणि त्यांच्या सन्मान व सुरक्षिततेचे समर्थन करून स्वच्छता परिसंस्थेला बळकट करत आहोत. एएससीआयच्या भागीदारीत सुरू केलेल्या 'सेफर' (SAFER) उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही गंभीर सुरक्षा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विस्तारक्षम नवकल्पनांना सक्षम करून ही कटिबद्धता पुढे नेत आहोत. नवकल्पना आणि प्रत्यक्ष जमिनीवरील परिणाम यांना एकत्र आणून दररोज अधिकाधिक लोकांपर्यंत उत्तम आरोग्य पोहोचवणे, हे आमचे ध्येय आहे.”
या राष्ट्रीय नवकल्पना स्पर्धेला एका प्रतिष्ठित सुकाणू समितीद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे. यात सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, प्रशासन, शहरी विकास, पाणी आणि आरोग्य क्षेत्रातील अग्रगण्य तज्ञांचा समावेश असेल. या सुकाणू समितीचे अध्यक्ष रेकिटचे दक्षिण आशिया, एमईएनएआरपी (MENARP) आणि आफ्रिका विभागाचे कम्युनिकेशन्स अँड कॉर्पोरेट अफेयर्स संचालक प्रा. रवी भटनागर असतील. तसेच डॉ. रमाकांत, उप-सल्लागार, केंद्रीय सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरण अभियांत्रिकी संस्था (सीपीएचइइओ) गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय; पद्मश्री प्रा. (डॉ.) इंदिरा चक्रवर्ती, सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरण क्षेत्रातील प्रख्यात तज्ज्ञ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेज ऑफ इंडियाचे सीईयूजी अँड आयडी केंद्र संचालक (निवृत्त) आयएएस डॉ. बी. जनार्दन रेड्डी यांचा समावेश असेल
सन्माननीय ज्युरींद्वारे या स्पर्धेचे मूल्यांकन कऱण्यात येईल. यामध्ये जागरण पहल इम्पॅक्ट इनिशिएटिव्हज अँड पार्टनरशिप्सचे संचालक श्री. साहिल तलवार; आगा खान फाउंडेशन डब्ल्यूएएसएचचे सेक्टर लीड आणि संचालक श्री. असद उमर; सीईयूजी अँड आयडी, एएससीआयच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. एम. स्नेहलथा आणि रेकिट पार्टनरशिप्सचे वरिष्ठ व्यवस्थापक डॉ. विवेक सिंग चौहान यांचा समावेश आहे.
सेफर चॅलेंजची अंमलबजावणी पिच, पायलट आणि स्केल या तीन टप्प्यांत केली जाईल. शिक्षणतज्ज्ञ, सरकारी अधिकारी, स्वच्छता तज्ज्ञ आणि स्वच्छता कर्मचारी प्रतिनिधी यांचा समावेश असलेल्या बहुविद्याशाखीय ज्युरीद्वारे सर्वप्रथम प्रवेशिकांचे मूल्यांकन केले जाईल. त्यानंतर, निवडलेल्या नवकल्पनांची स्वच्छता कर्मचारी आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसोबत प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी करण्यात येईल आणि मग सरकारी व औद्योगिक व्यासपीठांद्वारे त्यांना व्यापक स्वीकृतीसाठी साहाय्य केले जाईल.
निवडलेल्या सहभागींना मार्गदर्शन, क्षेत्रीय पडताळणीच्या संधी, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी संपर्क, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि धोरण तज्ज्ञांशी संवाद, राष्ट्रीय स्तरावर मान्यता, तसेच प्रायोगिक अंमलबजावणी आणि भविष्यातील विस्तारासाठी साहाय्य मिळेल.
या स्पर्धेत विजेत्याला ५ लाख रुपये , प्रथम उपविजेत्याला २ लाख रुपये आणि द्वितीय उपविजेत्याला १ लाख रुपयांचे रोख अनुदान, तसेच त्यांच्या नवकल्पनांचा अधिक व्यापक स्वीकार होण्याच्या संधीही उपलब्ध आहेत. अर्ज १ सप्टेंबरपर्यंत खुले असून, विजेत्यांची घोषणा २ ऑक्टोबर रोजी केली जाईल.
इच्छुक नवसंशोधक https://asci.org.in/safer येथे त्यांचे अर्ज सादर करू शकतात.

إرسال تعليق