Top News

अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस कामगार संघटनेची राज्यस्तरीय महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न

 पुणे, दि. ७ जून : अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस कामगार संघटना (ट्रेड युनियन क्र. ७२६२) पुणे जिल्हा व पुणे शहर शाखेच्या वतीने सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी अल्पबचत भवन, पुणे येथे राज्यस्तरीय महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस राज्यभरातील पदाधिकारी व शेकडो सफाई कामगार उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी सदस्य, सफाई कर्मचारी आयोग मा. गोविंदभाई परमार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रीय प्रमुख महामंत्री डॉ. सुधाकर पणीकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष आसाराम टाक, प्रदेशाध्यक्ष दिलीपअण्णा चांगरे, प्रदेश महिला अध्यक्षा लीलाताई लाड, प्रदेश कार्याध्यक्ष अनुप खरारे यांच्यासह विविध राज्यस्तरीय पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत सफाई कामगारांच्या हक्कांसाठी पुढील आंदोलनांची दिशा ठरविण्याबाबत चर्चा करण्यात आली. विधानभवन मोर्चा, आझाद मैदान धरणे आंदोलन, रास्ता रोको, कामबंद आंदोलन तसेच जिल्हाधिकारी कार्यालयांवर निवेदन देण्याबाबत पदाधिकाऱ्यांनी आपली मते मांडली.

यावेळी संघटनेने महाराष्ट्र शासनाकडे पुढील प्रमुख मागण्या केल्या :

ठेकेदारी पद्धत बंद करून राज्यात सफाई कर्मचाऱ्यांची एक लाख कायमस्वरूपी पदे भरावीत.

लाड-पागे समितीच्या शिफारशी तात्काळ लागू कराव्यात.

मेहतर, वाल्मिकी, सुदर्शन समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी.

संबंधित समाजघटकांना उपवर्गीकरण करून ३ टक्के स्वतंत्र आरक्षण द्यावे.

राज्य परिवहन महामंडळातील शौचालय व्यवस्थापनाची कंत्राटे रद्द करून ती समाजातील संस्थांना द्यावीत.

१९५० पूर्वीच्या जात प्रमाणपत्राची अट रद्द करावी.

सफाई कामगारांना घरे व जागा मालकीहक्काने देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर आवास योजनेअंतर्गत घरे उपलब्ध करून द्यावीत.

सफाई कामगारांसाठी स्वतंत्र माथाडी बोर्ड स्थापन करावा.

बैठकीत राज्यातील सफाई कामगारांच्या प्रश्नांवर शा




सनाने आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

तसेच, जातीय उपवर्गीकरण समितीची स्थापना करण्यात आली असून प्रदेश कार्याध्यक्ष अनुप खरारे यांची समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

कार्यक्रमाची प्रस्तावना प्रदेश महामंत्री पी. बी. भातकुले यांनी केली. सूत्रसंचालन राष्ट्रीय प्रमुख महामंत्री डॉ. सुधाकर पणीकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रदेशाध्यक्ष दिलीपअण्णा चांगरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पुणे जिल्हा व पुणे शहर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post
Media World News

भारत की बेटी पुरस्कार

Bharat ki Beti Award 2026

🎧 LIVE FM RADIO




🔊 Volume