Top News

निखिल खंदारे यांची आम आदमी पार्टी महाराष्ट्राच्या युवा आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

 पुणे :आम आदमी पार्टी, महाराष्ट्राच्या युवा आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी श्री. निखिल खंदारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास दाखवत ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.

निखिल खंदारे हे गेल्या काही वर्षांपासून सामाजिक, विद्यार्थी संघटना तसेच आम आदमी पार्टीच्या युवा आघाडीमध्ये सक्रियपणे कार्यरत आहेत. युवकांचे शिक्षण, बेरोजगारी, रोजगाराच्या संधी आणि कौशल्य विकासासह सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठविला आहे.


या नियुक्तीबाबत निखिल खंदारे म्हणाले, “माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास दाखवून ही जबाबदारी सोपविल्याबद्दल पक्षाच्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार. पक्षाने दाखविलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करणार आहे.”

“महाराष्ट्रातील युवकांचे शैक्षणिक, रोजगारविषयक आणि सामाजिक प्रश्न अधिक ताकदीने मांडण्यासोबतच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठीही सातत्याने संघर्ष करणार आहे. पक्षाचे नेतृत्व, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन युवकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रभावीपणे काम करणार आहे,” असेही त्यांनी सांगितले.


Post a Comment

Previous Post Next Post
Media World News

भारत की बेटी पुरस्कार

Bharat ki Beti Award 2026

🎧 LIVE FM RADIO




🔊 Volume