Top News

महेश नवमी निमित्त कोंढवा परिसरात भव्य आयोजन

 पुणे : जय महेश मंच, कोंढवा यांच्या वतीने माहेश्वरी समाजाचा ५१५९ वा उत्पत्ती दिवस अर्थात महेश नवमी उत्सव मंगळवार, दि. २३ जून २०२६ रोजी कोंढवा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. गेल्या दहा वर्षांपासून कोंढवा, पिसोळी, बिबवेवाडी आणि उंड्री परिसरातील माहेश्वरी समाजाला एकत्रित आणत विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम राबविणाऱ्या जय महेश मंचतर्फे या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८.३० ते ९.३० या वेळेत यशोधन सोसायटी येथे भगवान महेश यांचा अभिषेक करून होणार आहे. 

सकाळी १०.३० वाजता यशोधन सोसायटी येथून भव्य शोभायात्रेला प्रारंभ होईल. ही शोभायात्रा यशोधन सोसायटी, शांतिनगर सोसायटी, साळवे गार्डन या मार्गाने पार पडणार आहे. दुपारी १२ ते १२.३० या वेळेत विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, त्यानंतर दुपारी १२.३० ते २.३० या वेळेत मान्यवरांचा गौरव, पुरस्कार वितरण आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.

यंदाच्या ‘महेश गौरव पुरस्कार २०२६’ साठी साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल सत्येंद्रजी राठी आणि उद्योजिका म्हणून उल्लेखनीय कार्याबद्दल



श्रुतिजी करनानी
यांची निवड करण्यात आली आहे.

या कार्यक्रमासाठी महेश सहकारी बँक, मार्केट यार्ड, पुणे; तिरुपती नागरी सहकारी पतसंस्था, पुणे; महेश नागरी सहकारी पतसंस्था, पुणे तसेच आराधना मॅचिंग्स प्रा. लि., लक्ष्मी रोड, पुणे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

माहेश्वरी समाजातील सर्व बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महेश नवमी उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन जय महेश मंचचे अध्यक्ष सीए सचिनकुमार कालाणी आणि सचिव प्रविण तोष्णीवाल यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
Media World News

भारत की बेटी पुरस्कार

Bharat ki Beti Award 2026

🎧 LIVE FM RADIO




🔊 Volume