Top News

इंदिरा आयव्हीएफच्या नव्या फर्टिलिटी सेंटरचे बाणेर येथे केले उद्घाटन

 पुणे, २४ जुलै २०२६ : भारतातील अग्रगण्य फर्टिलिटी सर्व्हिस प्रोव्हायडर्सपैकी एक असलेल्या इंदिरा आयव्हीएफने बाणेर, पुणे येथे आपल्या नव्या फर्टिलिटी सेंटरचे उद्घाटन केले आहे. हे ग्रुपचे पुण्यातील ७ वे क्लिनिक आहे. महाराष्ट्रातील वेगाने वाढणाऱ्या रहिवासी भागांमध्ये राहणाऱ्या लोकांपर्यंत आणि जोडप्यांपर्यंत संपूर्ण फर्टिलिटी केअर आणि रिप्रोडक्टिव्ह हेल्थकेअरची सुविधा पोहोचवण्याच्या दिशेने हे आणखी एक पाऊल आहे. हे सेंटर सेकंड फ्लोअर, ला कमर्शियल, बाणेर मेन रोड, रिजन्सी कॉस्मॉस बिल्डिंगजवळ, ट्रेंड्स स्टोअरजवळ, पुणे येथे सुरू करण्यात आले आहे. फर्टिलिटी आणि असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह सर्व्हिसेसच्या संपूर्ण सुविधांनी सुसज्ज असलेले हे सेंटर रुग्णांना इंदिरा आयव्हीएफच्या स्टँडर्ड क्लिनिकल प्रोटोकॉल, लॅबोरेटरी सिस्टम आणि पेशंट केअर प्रोसेसेसच्या माध्यमातून उपचार सेवा देईल.

उद्घाटन समारंभात विशेष पाहुणे झोनल बिझनेस डायरेक्टर अँड सेंटर हेड इंदिरा आयव्हीएफ पुणे डॉ. अमोल लुंकड, स्पेशल गेस्ट डॉ. शशिकांत आव्हाड, स्त्रीरोगतज्ज्ञ व आयव्हीएफ विशेषज्ञ, इंदिरा आयव्हीएफ, पिंपरी-चिंचवड, पुणे, या प्रसंगी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अँड सेंटर हेड इंदिरा आयव्हीएफ बानेर डॉ. जयदीप काळे तसेच वरिष्ठ वैद्यकीय व्यावसायिक आणि प्रतिनिधींनीही सहभाग घेतला.


विस्तारावर भर देत इंदिरा आयव्हीएफ लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर नितीज मुर्डिया यांनी सांगितले की, पुणे हे एक महत्त्वाचे हेल्थकेअर हब बनले आहे आणि इथे ऑर्गनाइज्ड फर्टिलिटी सर्व्हिस वेगाने वाढत आहे. , बाणेर येथील आमचा विस्तार सेंटर्सच्या मोठ्या नेटवर्कच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोच वाढवण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे प्रतीक आहे. त्याचबरोबर, आम्ही प्रत्येक इंदिरा आयव्हीएफ क्लिनिकमध्ये क्लिनिकल प्रोटोकॉल, लॅबोरेटरी सिस्टम आणि रुग्णांच्या केअरचा समान स्टँडर्ड राखण्यासाठीही कटिबद्ध आहोत.

झोनल बिझनेस डायरेक्टर अँड सेंटर हेड इंदिरा आयव्हीएफ पुणे डॉ. अमोल लुंकड यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत फर्टिलिटीबाबत जागरूकता वाढली आहे आणि अधिकाधिक लोक सुरुवातीच्या टप्प्यातच वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी पुढे येत आहेत. बाणेर सेंटर याच सकारात्मक बदलाला पाठबळ देण्यासाठी सुरू करण्यात आले आहे. हे सेंटर स्टँडर्ड क्लिनिकल आणि लॅबोरेटरी प्रॅक्टिसच्या माध्यमातून स्ट्रक्चर्ड फर्टिलिटी तपासणी, एव्हिडन्स बेस्ड ट्रीटमेंट प्लॅनिंग आणि निरंतर केअरची सुविधा देते.


डॉ. शशिकांत आव्हाड, स्त्रीरोगतज्ज्ञ व आयव्हीएफ विशेषज्ञ, इंदिरा आयव्हीएफ, पिंपरी-चिंचवड, पुणे यांनी सांगितले की, फर्टिलिटी ट्रीटमेंट केवळ वैद्यकीय प्रोसीजर्सपुरते मर्यादित नसते. यासाठी प्रत्येक रुग्णाच्या क्लिनिकल प्रोफाइलनुसार योग्य काउन्सेलिंग, स्पष्ट चर्चा आणि पर्सनलाइज्ड ट्रीटमेंट प्लॅनिंगची गरज असते. बाणेर सेंटरमध्ये आमचे उद्दिष्ट असे वातावरण उपलब्ध करून देणे आहे, जिथे रुग्णांना त्यांच्या फर्टिलिटी प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर संपूर्ण मार्गदर्शन मिळू शकेल.

एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अँड इंदिरा आयव्हीएफ बाणेर सेंटर हेड डॉ. जयदीप काळे यांनी सांगितले की, इथे सेंटर सुरू झाल्यामुळे आम्ही रुग्णांना त्यांच्याच परिसरात सेवा देत आहोत, ज्यामुळे त्यांना दूरच्या शहरांमध्ये प्रवास करण्याची गरज राहणार नाही आणि उपचारही सातत्याने सुरू राहतील. आमची टीम परस्पर समन्वयाने पेशंट-केंद्रित पद्धतीने पुरुष आणि महिलांच्या फर्टिलिटीच्या तपासणीत मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे, ज्यामध्ये क्लिनिकल तज्ज्ञता आणि आपुलकीने केअर यांचाही समावेश आहे.


या उद्घाटनासोबत इंदिरा आयव्हीएफने आपला राष्ट्रीय विस्तार सुरू ठेवला आहे, हे सेंटर संपूर्ण भारतातील २०० क्लिनिकांच्या नेटवर्कमध्ये जोडले गेले आहे. बाणेर सेंटर पुरुष आणि महिला दोघांच्याही वंधत्वासंबंधी समस्यांसाठी फर्टिलिटी आणि असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह सर्व्हिसेस देईल, ज्यांना स्टँडर्ड लॅबोरेटरी प्रक्रिया, इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्ड्स आणि पेशंट सेफ्टी सिस्टमचे समर्थन मिळेल.

Post a Comment

Previous Post Next Post
Media World News

भारत की बेटी पुरस्कार

Bharat ki Beti Award 2026

🎧 LIVE FM RADIO




🔊 Volume