Top News

अॅड. एस. के. जैन यांना स्व. मो. गो. चाफेकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर

 पुणे : पुणे माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित, पुणे यांच्या वतीने संस्थेचे संस्थापक गुरुवर्य स्व. मोरेश्वर गोपाळ चाफेकर यांच्या स्मरणार्थ प्रदान करण्यात येणारा स्व. मो. गो. चाफेकर जीवन गौरव पुरस्कार २०२६ यंदा शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अॅड. एस. के. जैन यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण शुक्रवार, दि. १७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता सदाशिव पेठ येथील भारत इतिहास संशोधक मंडळाच्या सभागृहात होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष महादेव माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष डॉ. कल्याण वाघ, खजिनदार संजय लोंढे, मानद सचिव संदीप घोलप तसेच संचालक मंडळातील राज मुजावर, शिवाजी कामथे, विजय कचरे, धोंडीबा तरटे, डॉ. मंगल शिंदे, पुष्पक कांदळकर, दत्तात्रय हेगडकर, हर्षा पिसाळ, भगवान निक्रड आणि विठ्ठल रणशूर (तज्ज्ञ संचालक) उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील उपस्थित राहणार आहेत. 


महादेव माने म्हणाले, सहकार हेच जीवन या ब्रीदवाक्याने गेली ८१ वर्षे कार्यरत असलेल्या पुणे माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढीतर्फे शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीचा दरवर्षी या पुरस्काराने सन्मान केला जातो. यंदाचा पुरस्कार खडकी शिक्षण संस्थेचे मानद अध्यक्ष तसेच शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे नियामक मंडळ माजी अध्यक्ष अॅड. एस. के. जैन यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप रु. २५,००१/- चा धनादेश, मानपत्र, पुणेरी पगडी, शाल असा असणार आहे.

महादेव माने म्हणाले, शिक्षण क्षेत्रात मोलाचे आणि दीर्घकालीन योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव व्हावा, हा या पुरस्कारामागील प्रमुख उद्देश आहे. मागील वर्षी हा पुरस्कार प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. डॉ. गजानन एकबोटे यांना प्रदान करण्यात आला होता. 


पुणे माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढीचा आज २,८०० सभासदांचा परिवार असून संस्थेने १३३ कोटी रुपयांच्या आर्थिक उलाढालीचा टप्पा पार केला आहे. संपूर्ण पुणे जिल्हा हे संस्थेचे कार्यक्षेत्र असून सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्थांमध्ये तिची गणना होते. सभासदांसाठी तिळगूळ समारंभ, निवृत्त सभासद सत्कार, मयत सभासदांच्या वारसांसाठी आधार योजना, संपूर्ण कर्जाला विमा संरक्षण, देश-विदेश सहली, गुणवंत शिक्षक सन्मान सोहळा, गुणी पाल्य सन्मान सोहळा आदी विविध उपक्रम संस्थेमार्फत सातत्याने राबविण्यात येत असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.


Post a Comment

Previous Post Next Post
Media World News

भारत की बेटी पुरस्कार

Bharat ki Beti Award 2026

🎧 LIVE FM RADIO




🔊 Volume