Top News

ओएसिस फर्टिलिटीतर्फे पुण्यात ‘जननी डायलॉग्स’चे आयोजन

 पुणे, २३ जुलै २०२६: भारतात बदलती जीवनशैली, करिअरला दिले जाणारे प्राधान्य, आर्थिक नियोजन आणि वाढत्या वयामुळे कुटुंब नियोजनाचे निर्णय अधिक गुंतागुंतीचे होत आहेत. या पार्श्वभूमीवर ओएसिस फर्टिलिटीतर्फे पुण्यात ‘जननी डायलॉग्स’ या सार्वजनिक हिताच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. "द पॅरेंटहुड पॅराडॉक्स : बिल्डिंग अ फॅमिली-फ्रेंडली इंडिया" या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात प्रजनन आरोग्य, पालकत्वाविषयी जागरूकता आणि माहितीपूर्ण कुटुंब नियोजन यावर विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी सखोल चर्चा केली.

या कार्यक्रमात वैद्यकीय तज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, मानव संसाधन क्षेत्रातील प्रतिनिधी, सामाजिक संस्था तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले. हैदराबाद येथून आयोजित राष्ट्रीय चर्चेचे थेट प्रक्षेपण पुण्यासह देशातील विविध शहरांमध्ये करण्यात आले. 


चर्चेदरम्यान भारतातील एकूण प्रजनन दर हा पुनर्स्थापना पातळीपेक्षा खाली आल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. विवाह उशिरा होणे हेच एकमेव कारण नसून, शिक्षण, करिअर, आर्थिक स्थैर्य आणि वैयक्तिक ध्येयांना प्राधान्य देत अनेक जोडपी पालकत्व पुढे ढकलत असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले. मात्र, मानवी प्रजननक्षमतेचे जैविक घड्याळ आपल्या नैसर्गिक गतीनेच चालत असल्याने योग्य वेळी प्रजनन आरोग्याविषयी जागरूकता आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधोरेखित करण्यात आले.

कार्यक्रमात ‘पॅरेंटहुड पॅराडॉक्स’ या संकल्पनेवर विशेष भर देण्यात आला. बदलती जीवनशैली आणि अपरिवर्तित जैविक वास्तव यातील वाढत्या अंतरामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांवर चर्चा करण्यात आली. कोणाच्याही वैयक्तिक निर्णयावर प्रभाव टाकणे हा या उपक्रमाचा उद्देश नसून, योग्य माहिती आणि वेळेवर मार्गदर्शनाद्वारे सुजाण निर्णय घेण्यास मदत करणे हेच या कार्यक्रमाचे ध्येय असल्याचे स्पष्ट करण्यात आले.


यावेळी पालकत्वाच्या आर्थिक पैलूंवरही चर्चा झाली. कुटुंब नियोजन ही केवळ वैयक्तिक जबाबदारी नसून शासन, नियोक्ते, आरोग्य संस्था आणि समाज यांनीही सकारात्मक भूमिका बजावण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. तसेच, वडिलांचा सक्रिय सहभाग, कार्यस्थळावरील अनुकूल धोरणे आणि समाजाचा पाठिंबा यावरही भर देण्यात आला.

याच कार्यक्रमात ‘ओएसिस अकॅडमी’ या प्रजनन आरोग्य आणि वंध्यत्व उपचार क्षेत्रातील शिक्षण व प्रशिक्षण उपक्रमाचीही घोषणा करण्यात आली. संशोधन, वैज्ञानिक प्रकाशने, स्त्रीरोगतज्ज्ञ आणि वैद्यकीय व्यावसायिकांसोबत ज्ञानाची देवाणघेवाण तसेच भविष्यातील तज्ज्ञ डॉक्टर आणि एम्ब्रायोलॉजिस्ट तयार करण्यासाठी ही अकॅडमी कार्य करणार आहे.


अलीकडेच ईएसएचआरई २०२६ या आंतरराष्ट्रीय परिषदेत ओएसिस फर्टिलिटीने २९ वैज्ञानिक संशोधन सादरीकरणे केली असून, आजपर्यंत २५० हून अधिक डॉक्टर आणि २०० एम्ब्रायोलॉजिस्टना प्रशिक्षण दिले आहे. विशेषतः टियर-२ आणि टियर-३ शहरांमध्ये प्रशिक्षित तज्ज्ञांची संख्या वाढविण्याचा अकॅडमीचा संकल्प आहे.

डॉ. नीलेश उन्मेश बलकवडे, रिजनल मेडिकल हेड, ओएसिस फर्टिलिटी, म्हणाले,

"प्रजनन आरोग्याबाबत योग्य वेळी जागरूकता निर्माण करणे आणि माहितीपूर्ण निर्णय घेणे आज अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर गुणवत्तापूर्ण उपचार अधिकाधिक जोडप्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशिक्षित तज्ज्ञांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. ‘ओएसिस अकॅडमी’द्वारे आम्ही या दिशेने सातत्याने कार्य करत राहू."

ओएसिस फर्टिलिटीने स्पष्ट केले की ‘जननी डायलॉग्स’ हा कोणत्याही आयव्हीएफ उपचाराचा प्रचार नसून सार्वजनिक हिताचा जनजागृती उपक्रम आहे. या माध्यमातून कोणत्याही विशिष्ट उपचारपद्धतीचा प्रचार केला जात नाही किंवा प्रत्येकाने पालकत्व स्वीकारावे असा संदेश दिला जात नाही. उलट, कुटुंब निर्माण करण्याच्या प्रवासात सामाजिक, आर्थिक, वैद्यकीय आणि कार्यस्थळाशी संबंधित अडथळ्यांवर चर्चा करून त्यावरील उपाय शोधण्याचा हा प्रयत्न आहे.

कार्यक्रमाचा समारोप ‘जननी डिक्लेरेशन’ द्वारे करण्यात आला. आजीवन प्रजनन आरोग्य, माहितीपूर्ण निर्णय, पालकत्वातील समान जबाबदारी, प्रत्येक पालकत्वाच्या प्रवासाचा सन्मान, करिअर आणि कुटुंबातील समतोल आणि ‘फॅमिली-फ्रेंडली इंडिया’ घडविण्याची सामूहिक बांधिलकी या सहा मूलभूत तत्त्वांवर या घोषणापत्रात भर देण्यात आला.

ओएसिस फर्टिलिटीने ‘जननी डायलॉग्स’ हा उपक्रम दरवर्षी आयोजित करून संशोधन, जनजागृती आणि विविध क्षेत्रांतील सहकार्याच्या माध्यमातून भारतातील प्रजनन आरोग्य अधिक सुलभ, परवडणारे आणि सर्वसमावेशक करण्यासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post
Media World News

भारत की बेटी पुरस्कार

Bharat ki Beti Award 2026

🎧 LIVE FM RADIO




🔊 Volume