Top News

देशभक्तीच्या रंगात रंगणार 'वन्द्य वंदे मातरम' मेळा

 पुणे : भारताच्या राष्ट्रीय गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शिक्षण प्रसारक मंडळी पुणे, पवित्रम फाउंडेशन आणि संस्कार भारती, पुणे महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने 'वन्द्य वंदे मातरम - मेळा देशभक्तीचा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, १५ आॅगस्ट रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत टिळक रस्त्यावरील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या आवारात हा मेळा होणार आहे, अशी माहिती शिक्षण प्रसारक मंडळीचे नियामक मंडळ अध्यक्ष सुधीर काळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला शिक्षण प्रसारक मंडळीचे नियामक मंडळ उपाध्यक्ष राधेश्याम अग्रवाल, महाविद्यालयीन विकास समिती सदस्य आणि अध्यक्ष तुषार कुलकर्णी, सदस्य आणि अध्यक्ष विनाअनुदानित विभाग पराग ठाकूर, सचिव रमा कुलकर्णी, कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. डॉ. अविनाश मोहरील उपस्थित होते.


राष्ट्रभक्ती, भारतीय संस्कृती आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा देणा-या विविध उपक्रमांचा या मेळ्यात समावेश आहे. भारतमातेचे पूजन व भारतमातेला अभिवादन, १५० वर्षांच्या गौरवशाली परंपरेतील वंदे मातरमचे सामूहिक गायन, रक्तदान शिबिर, एक राखी सैनिकांसाठी हा उपक्रम, सूर्यनमस्कार, मल्लखांब, लाठी-काठी व मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके तसेच देशभक्तिपर गीते, भजन, पोवाडे आणि सांस्कृतिक सादरीकरणे होणार आहेत.

चित्रकला व रांगोळी स्पर्धा, उत्कृष्ट कलाकृतींचे प्रदर्शन, स्वदेशी, खादी, पुस्तके, खाद्यपदार्थ व सामाजिक उपक्रमांचे स्टॉल, भारतीय स्वातंत्र्यवीरांच्या जीवनगौरवाची प्रेरणादायी प्रदर्शनी, भारतीय पारंपरिक शस्त्रास्त्रांचे वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शन, अवयवदान व नेत्रदान जनजागृती अभियान, शंखनादाच्या मंगल स्वरात राष्ट्रभक्तीचा जागर आणि राष्ट्रप्रेम जागविणारे प्रेरणादायी कविसंमेलन आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


पुणेकरांनी या मेळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. विविध शाळा- महाविद्यालयांतील विद्यार्थी, तरुण, शिक्षक आणि नागरिकांनी सहभागी होऊन देशभक्तीचा जागर अनुभवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post
Media World News

भारत की बेटी पुरस्कार

Bharat ki Beti Award 2026

🎧 LIVE FM RADIO




🔊 Volume