Top News

द्वारिका धाम टॉवर टी-५ सोसायटीच्या कारभाराची चौकशीचे आदेश

 पुणे : टिळेकर नगर, कोंढवा बुद्रुक येथील द्वारिका धाम टॉवर टी-५ सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या कथित नियमबाह्य कारभाराबाबत करण्यात आलेल्या विविध तक्रारींची उपनिबंधक श्री. डी. एस. हौसारे यांनी दखल घेतली आहे. तक्रारींसोबत सादर करण्यात आलेली कागदपत्रे व उपलब्ध पुराव्यांची पडताळणी करून संस्थेच्या कामकाजाची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम ८९ (अ) (१) अन्वये अधिकृत तपासणी व चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे तक्रारदारांकडून सांगण्यात आले.

सोसायटीमधील सध्याच्या कमिटीच्या स्थापनेबाबत तसेच तिच्या कार्यपद्धतीबाबत काही गंभीर आक्षेप उपस्थित करण्यात आले आहेत. मूळ नोंदणी प्रमाणपत्र उपलब्ध नसताना बँक खाते उघडणे, निवडणूक अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीबाबत उपस्थित करण्यात आलेले प्रश्न, तसेच कमिटी स्थापन करण्यापूर्वी सोसायटीतील सभासदांना आवश्यक ती नोटीस देण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.


या संदर्भात सोसायटीचे सभासद विजयसिंह गायकवाड यांनी उपनिबंधक कार्यालयाकडे वेळोवेळी विविध तक्रारी व अर्ज सादर केले होते. या तक्रारींच्या अनुषंगाने उपलब्ध कागदपत्रे, पुरावे आणि संबंधित बाबींची पडताळणी करण्यात आल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

आता या अधिकृत तपासणीमध्ये कमिटीच्या कार्यकाळातील निर्णय, आर्थिक व्यवहार, प्रशासकीय कामकाज, कमिटी स्थापनेची प्रक्रिया आणि इतर नियमबाह्य असल्याचा आरोप करण्यात आलेल्या बाबींची तपासणी होणार आहे. त्यामुळे संबंधित कमिटीचा कारभार नियमांनुसार झाला आहे की नाही, तसेच तक्रारींमध्ये करण्यात आलेले आरोप कितपत तथ्यपूर्ण आहेत, हे चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे.


दरम्यान, चौकशी पूर्ण होऊन अधिकृत निष्कर्ष समोर येईपर्यंत कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरविणे योग्य ठरणार नाही. उपनिबंधक कार्यालयाच्या अधिकृत तपासणीतून वस्तुस्थिती स्पष्ट होण्याची अपेक्षा असून, चौकशीच्या निष्कर्षानंतरच पुढील कायदेशीर बाबी स्पष्ट होतील.


Post a Comment

Previous Post Next Post
Media World News

भारत की बेटी पुरस्कार

Bharat ki Beti Award 2026

🎧 LIVE FM RADIO




🔊 Volume