Top News

महाकालेश्वर व काळभैरवनाथ चरणी संग्रामसिंग टाक यांची भक्तिभावाने सेवा

उज्जैन: श्रावण महिन्याच्या पवित्र प्रारंभानिमित्त पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक संग्रामसिंग टाक यांनी उज्जैन येथील श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन महादेवाच्या चरणी चांदीचा भव्यदिव्य व आकर्षक हार अर्पण केला. संग्रामसिंग टाक यांनी मित्रपरिवारासह महाकालेश्वराचे मनोभावे दर्शन घेत भोलेनाथाच्या चरणी सेवा अर्पण केली.

यावेळी गोलू ठाकूर, बिट्टू यादव, गौरव बोडके, अक्षय माने, रोहित कोतवाल यांच्यासह मित्रपरिवार उपस्थित होता. श्रावणाच्या पवित्र काळात महाकालेश्वराच्या चरणी सेवा अर्पण करण्याचा हा भक्तिमय सोहळा उत्साहात पार पडला.


त्यानंतर उज्जैनचे आराध्य व कोतवाल म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री काळभैरवनाथाचे संग्रामसिंग टाक यांनी मित्रपरिवारासह दर्शन घेतले. काळभैरवनाथाच्या चरणी त्यांनी चांदीचे डोळे अर्पण करून मनोभावे पूजन केले.

श्रावण महिन्यात महाकालेश्वर आणि काळभैरवनाथाच्या चरणी सेवा अर्पण करत संग्रामसिंग टाक व त्यांच्या मित्रपरिवाराने धार्मिक श्रद्धा आणि भक्तिभाव जपत दर्शन घेतले. यावेळी संग्रामसिंग टाक, गौरव बोडके, अक्षय माने, रोहित कोतवाल आदी मित्र उपस्थित होते.


महाकालेश्वराच्या चरणी अर्पण केलेला चांदीचा हार आणि काळभैरवनाथाला अर्पण केलेले चांदीचे डोळे हे भक्तिभावाचे प्रतीक ठरले.

Post a Comment

Previous Post Next Post
Media World News

भारत की बेटी पुरस्कार

Bharat ki Beti Award 2026

🎧 LIVE FM RADIO




🔊 Volume