Top News

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचा मंगळवारी ११वा वर्धापन दिन

 पुणे : एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (एमआयटी एडीटी) विद्यापीठ, विश्वराजबाग, लोणी-काळभोर, पुणे येथे येत्या मंगळवारी (११ ऑगस्ट २०२६) विद्यापीठाचा ११वा वर्धापन दिन भव्य कार्यक्रमाद्वारे साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. तसेच, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)चे माजी महासंचालक पद्मश्री प्रा. डॉ. बलराम भार्गव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

तसेच, बुधवारी (१२ ऑगस्ट) एमआयटी एडीटी विद्यापीठात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या ११व्या बॅचच्या स्वागत समारंभाचे, अर्थात ‘विद्यारंभ-२६’ या तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल जिष्णु देव वर्मा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय, महाराष्ट्राचे माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक जे. डी. लक्ष्मीनारायण हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.


हे दोन्ही कार्यक्रम विद्यापीठातील ‘स्वामी विवेकानंद सभामंडपात’ हजारो विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत. माईर्स एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमांना एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., कार्यकारी संचालक प्रा. डॉ. सुनीता कराड, कार्यकारी संचालक प्रा. ज्योती ढाकणे, कार्यकारी संचालक प्रा.डाॅ. विनायक घैसास, प्रोवोस्ट डाॅ.सायली गणकर, प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, डॉ. नचिकेत ठाकूर आणि कुलसचिव डॉ. महेश चोपडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

वर्धापन दिन तसेच ‘विद्यारंभ-२६’ या तीन दिवसीय कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना विद्यापीठात राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक, संशोधन, नवोपक्रम व विद्यार्थी विकास उपक्रमांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच, याप्रसंगी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे.

एमआयटी एडीटी विद्यापीठात यंदाही मोठ्या प्रमाणावर नव्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, त्यांच्या स्वागतासाठी तीन दिवस विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध क्षेत्रांतील नामवंत उद्योगतज्ज्ञांच्या मार्गदर्शनपर सत्रांचाही समावेश असणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्र.कुलपती डाॅ.रामचंद्र पुजेरी आणि कुलसचिव डॉ. महेश चोपडे यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.


राष्ट्रीय गरिमा पुरस्काराचेही वितरण

‘विद्यारंभ-२६’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षणतज्ज्ञांना ‘राष्ट्रीय गरिमा पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये केंद्रीय विद्यापीठ, राजस्थानचे कुलगुरू डॉ. आनंद भालेराव, महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर आणि एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. महेश चोपडे यांचा समावेश आहे. या मान्यवरांना राज्यपालांच्या हस्ते ‘राष्ट्रीय गरिमा पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. नचिकेत ठाकूर यांनी याप्रसंगी दिली.



Post a Comment

Previous Post Next Post
Media World News

भारत की बेटी पुरस्कार

Bharat ki Beti Award 2026

🎧 LIVE FM RADIO




🔊 Volume