Top News

सीजीएचएस लाभार्थी कल्याण संघ, भारत (CBWAI) चा ८ वा स्थापना दिवस उत्साहात

 पुणे, दि. १ ऑगस्ट : सीजीएचएस लाभार्थी कल्याण संघ, भारत (CGHS Beneficiaries' Welfare Association of India – CBWAI) यांच्या वतीने संस्थेचा ८ वा स्थापना दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त AIMS हॉस्पिटल, औंध यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला सीजीएचएस लाभार्थी, निवृत्त केंद्रीय कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


हा कार्यक्रम कल्पतरू कम्युनिटी हॉल, एआरडीई इस्टेट, गणेशखिंड, पुणे येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. एम. व्ही. रमेश कुमार, उत्कृष्ट वैज्ञानिक तथा संचालक, आयुध संशोधन व विकास प्रतिष्ठान (ARDE), डीआरडीओ, संरक्षण मंत्रालय, पुणे हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. चंद्रप्रकाश चौधरी, अपर संचालक, सीजीएचएस, पुणे यांनी मार्गदर्शन केले. सोबतच डॉ. संजीव केंद्रे आणि डॉ. राणा यांनी शुभेच्छा दिल्या. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. 


यावेळी एम. व्ही. रमेश कुमार यांनी सीजीएचएस लाभार्थ्यांच्या आरोग्यविषयक सुविधा, प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीचे महत्त्व आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली. तसेच सीजीएचएस लाभार्थी कल्याण संघ, भारत (CBWAI) गेल्या आठ वर्षांपासून लाभार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने कार्य करत असल्याबद्दल संघटनेच्या कार्याचे कौतुक केले.

आरोग्य तपासणी शिबिरात रक्तदाब, रक्तातील साखर, ईसीजी, HRV स्ट्रेस चाचणी तसेच विविध प्राथमिक आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. उपस्थित लाभार्थ्यांना तज्ज्ञ डॉक्टरांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन करून आवश्यक वैद्यकीय सल्लाही दिला. या शिबिराचा मोठ्या संख्येने उपस्थित लाभार्थ्यांनी लाभ घेतला.


कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संघटनेचे पदाधिकारी रंगनाथन कुमार, सुभाष धुळेकर, ज्ञानेश तांबेकर, रामचंद्र ठाकूर, सोमनाथन, ज्योत्स्ना महाडिक यांनी विशेष परिश्रम घेतले. सुभाष धुळेकर यांनी सूत्रसंचालन केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल सर्व उपस्थित मान्यवर, डॉक्टर, स्वयंसेवक आणि लाभार्थ्यांचे रामकृष्ण ठाकूर यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post
Media World News

भारत की बेटी पुरस्कार

Bharat ki Beti Award 2026

🎧 LIVE FM RADIO




🔊 Volume