Top News

इग्नाईट-२०२६’ परिषदेचे १७ ते १९ जूनला पुण्यात आयोजन

 पुणे: येवलेवाडी येथील केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स संचालित केजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्चतर्फे इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स (आयईईई) पुणे सेक्शन यांच्या तांत्रिक सहकार्याने इनोव्हेशन अँड ग्रोथ इन नेक्स्ट-जन इंटेलिजंट टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग (इग्नाईट) २०२६ या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष श्री. कल्याण जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी संस्थेचे तांत्रिक संचालक डॉ. अजय फुलंबरकर, अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख, प्राचार्य डॉ. सुहास खोत, 'इग्नाईट'च्या चेअरपर्सन डॉ. निकिता कुलकर्णी, 'आयईईई'चे प्रतिनिधी प्रा. रहिमराजा शेख आदी उपस्थित होते.

श्री. कल्याण जाधव म्हणाले, "१७ ते १९ जून २०२६ या कालावधीत होणाऱ्या या परिषदेचे उद्घाटन बुधवार, दि. १७ जून २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता नगर रस्त्यावरील हॉटेल हयात पुणे येथे आयआयआयटी रायपूरचे माजी कुलगुरू व संचालक डॉ. पी. के. सिन्हा यांच्या हस्ते होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, सायबर सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे अध्यक्ष डॉ. हॅरॉल्ड डी'कोस्टा, आईईई पुणेचे अध्यक्ष अध्यक्ष डॉ. अमर बुचडे, इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह देसाई विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. परिषदेत विविध विद्यापीठांचे कुलगुरू, शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य, उद्योग क्षेत्रातील नेते आणि देशभरातील नामवंत शिक्षणतज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत."



प्रा. डॉ. सुहास खोत म्हणाले
, "या परिषदेमध्ये देश-विदेशातील संशोधक आणि शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ, प्राध्यापक, उद्योगतज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांकडून एकूण १,५४८ संशोधन प्रबंध आले होते. त्यातील ३५४ प्रबंध सादरीकरण आणि प्रकाशनासाठी निवडले गेले आहेत. ही परिषद ऑनलाईन व ऑफलाईन (हायब्रिड) पद्धतीने होणार असून, ७८ प्रबंध प्रत्यक्ष (ऑफलाइन), तर २७६ प्रबंध ऑनलाइन सादर केले जाणार आहेत. त्यामुळे जगभरातील संशोधकांना या परिषदेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. स्टॅनफर्ड विद्यापीठ, अमेरिका यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांमधील संशोधकांचाही या परिषदेत सहभाग आहे."

"सॉफ्टवेअर अभियांत्रिकी व सायबर सुरक्षा, सिग्नल प्रोसेसिंग व व्हीएलएसआय डिझाईन, ऊर्जा प्रणाली व अक्षय ऊर्जा, स्थापत्य व पर्यावरण अभियांत्रिकी, उत्पादन व ऑटोमोटिव्ह अभियांत्रिकी, कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग तसेच अनुप्रयुक्त विज्ञान व आंतरविद्याशाखीय संशोधन या विषयांवर चर्चासत्र होणार आहेत. या माध्यमातून विविध शाखांमधील सहकार्याला चालना मिळून उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाधारित उपाययोजनांवर अर्थपूर्ण चर्चा होणार आहे. यामध्ये विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या कृत्रिम बुद्धिमत्ता व डेटा सायन्स विभागाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. परीक्षित महल्ले, कॉग्निझंटचे प्रिन्सिपल आर्किटेक्ट (असोसिएट डायरेक्टर) पवन देशपांडे यांचे विशेष व्याख्यान होणार आहे, असे डॉ. खोत यांनी सांगितले.

अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, नवोपक्रम आणि शाश्वत विकासाच्या भविष्यास आकार देणाऱ्या उदयोन्मुख तंत्रज्ञानांवर चर्चा घडवून आणण्यासाठी संशोधक, प्राध्यापक, उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञ, नवोन्मेषक आणि विद्यार्थ्यांना एकत्र आणत जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही परिषद महत्वाची आहे. डॉ. अजय फुलंबरकर (सल्लागार अध्यक्ष), डॉ. सुहास खोत (संयोजक व संरक्षक) आणि डॉ. निकिता कुलकर्णी (परिषद अध्यक्ष व तांत्रिक कार्यक्रम अध्यक्ष) यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वाखाली आयोजित यशस्वीपणे पार पडत असल्याचे डॉ. अजय फुलंबरकर यांनी नमूद केले.

Post a Comment

Previous Post Next Post
Media World News

भारत की बेटी पुरस्कार

Bharat ki Beti Award 2026

🎧 LIVE FM RADIO




🔊 Volume