Top News

नेपाळमधील आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत भारतीय संघाचे घवघवीत यश

 पुणे: नेपाळ कराटे फेडरेशन संलग्न नेपाळ ऑलिम्पिक असोसिएशनच्या वतीने काठमांडू (नेपाळ) येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत भारतीय संघाने उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत




विविध देशांतील १,०००
हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.

कराटे डू कोबूडो असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र राज्यातून पाच खेळाडूंची भारतीय संघासाठी निवड करण्यात आली होती. या सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत पदकांची कमाई केली.

१४ वर्षांखालील गटातील यशस्वी खेळाडू :

कु. मृण्मयी किरवे – सुवर्णपदक (काता व कुमिते)

कु. आर्वी कराळे – कांस्यपदक (काता)

कु. स्नेहीत पाटील – रौप्यपदक (काता)

१७ वर्षांखालील गटातील यशस्वी खेळाडू :

कु. सार्थक जगताप – सुवर्णपदक (काता)

कु. हर्षवर्धन मोरे – सुवर्णपदक (काता)

या उल्लेखनीय यशाबद्दल विजयी खेळाडूंचे सर्व स्तरांतून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.

स्पर्धेदरम्यान प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सेन्साई माधवी तौर व सेन्साई विकास ताटे यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच यशस्वी खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक सिंहान लहू पारवे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या यशामुळे महाराष्ट्रासह भारताच्या कराटे क्षेत्रातील गुणवत्तेची पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप पडली असून, खेळाडूंच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
Media World News

भारत की बेटी पुरस्कार

Bharat ki Beti Award 2026

🎧 LIVE FM RADIO




🔊 Volume