पुणे : पद्मशाली पंच कमिटी अंतर्गत कार्यरत पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ गंजपेठ, टिंबर मार्केट येथील सावित्रीबाई फुले सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या समारंभात इयत्ता दहावी व बारावीतील प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी आणि विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना लॅपटॉप बॅग, पेन, पुस्तक आणि मोबाईल स्टँड भेटवस्तू स्वरूपात प्रदान करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करून त्यांना भविष्यातही उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रेरित करण्याचा उद्देश या उपक्रमामागे असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष शंकर गडृम, उपाध्यक्ष विनायक तुम्मा, राजेश कट्टा, जनरल सेक्रेटरी विनोद अंकम, सेक्रेटरी सत्यनारायण कंदुल, खजिनदार ललित चिंतल, विष्णू मंत्री तसेच सदस्य पुरुषोत्तम कटकम, साई यन्नम, अशोक कटकम, विजय वन्नम, सूर्यकांत मेरगु, यशवंत अंकम, विशाल पासकंटी, गिरीश गाजेंगी, प्राची झंपल आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरयू मंत्री-लोणकर आणि केदार लोणकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन ललित चिंतल यांनी केले.


Post a Comment