Top News

चातुर्मास निमित्त श्री शंखेश्वर पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिरात आचार्य श्री यशोविजयसुरीजी महाराज यांचे प्रवचन

 पुणे : चातुर्मास प्रवेशानिमित्त भवानी पेठ येथील श्री शंखेश्वर पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिरात आचार्य श्री यशोविजयसुरीजी महाराज यांच्या सान्निध्यात साध्वीजी श्री शाश्वतरती म.सा. आदी ठाणा ५ यांचा चातुर्मास प्रवेश सोहळा भक्तिमय व उत्साही वातावरणात संपन्न झाला.

याप्रसंगी आचार्य श्री यशोविजयसुरीजी महाराज यांची रामोशी गेट येथून भवानी पेठ येथील श्री शंखेश्वर पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिरापर्यंत पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने जैन समाजातील भाविक सहभागी झाले होते. 


चातुर्मास प्रवेशानिमित्त संपूर्ण मंदिर आकर्षक फुलांच्या सजावटीने नटले होते. मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुंदर रांगोळी काढून आचार्यश्रींचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर मंदिरात आयोजित धर्मसभेत आचार्य श्री यशोविजयसुरीजी महाराज यांनी चातुर्मासाचे आध्यात्मिक महत्त्व, संयम, तप, स्वाध्याय आणि सदाचार यावर मार्गदर्शन केले. त्यांच्या ओजस्वी प्रवचनाचा उपस्थित भाविकांनी मोठ्या श्रद्धेने लाभ घेतला. 


या कार्यक्रमास श्री शंखेश्वर पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिराचे अध्यक्ष रतन मेडतिया, सचिव नरेंद्र जैन, सदस्य कीर्तीकुमार ओसवाल, प्रकाश शहा, विलास ओसवाल, हस्तीमल मुथ्था, साकलचंद कटारिया, विनोद जैन, धनराज जैन, धनराज निबजिया, मनोज शहा तसेच जैन समाजातील अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
Media World News

भारत की बेटी पुरस्कार

Bharat ki Beti Award 2026

🎧 LIVE FM RADIO




🔊 Volume