Top News

आषाढी एकादशीनिमित्त शांतीदूत परिवारातर्फे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

 उमरगा : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने शांतीदूत परिवाराच्या वतीने ओम लॉन्स अँड रिसोर्ट, चौरस्ता, उमरगा येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सहभाग घेत वृक्षारोपण केले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रवीणजी स्वामी, नगराध्यक्ष किरणजी गायकवाड, पंचायत समिती सभापती आकांक्षाताई चौगुले, श्री अग्जप्पा देवस्थान कराळी अग्निबेटचे तेजसनाथ महाराज, वन अधिकारी दिनेश वाघमारे, कृषिभूषण गोविंदरावजी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी शांतीदूत परिवाराचे पदाधिकारी प्रा. युसुफ मुल्ला, प्राचार्य सोमनाथ महाजन, गणेश गरुड, नितीन गौरशेट्टी, मधुकर चौधरी, श्याम पाटील, जितेंद्र घोटाळे, ईश्वर मुगळे, संतोष मोहिते, परिवार स्नेही रविंद्र आळंगेकर, कृषी अधिकारी मुरलीधर जाधव, सेवानिवृत्त नगरसेवक शरद पवार, पत्रकार नसीरुद्दीन शेख, अरविंद पवार, कराळी देवस्थान ट्रस्टी, श्री व सौ. जाधव (जाजन मुगळी), प्रा. सौ. महाजन ताई, संगीता गायकवाड, ईश्वर आळंगे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात शांतीदूत परिवाराच्या संस्थापक अध्यक्षा सौ. विद्याताई जाधव आणि मार्गदर्शक डॉ. विठ्ठल जाधव (IPS), विशेष पोलिस महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य (सेवानिवृत्त) यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.


उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित करत शांतीदूत परिवाराच्या सामाजिक, पर्यावरणपूरक आणि जनहिताच्या कार्याचे कौतुक केले. आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post
Media World News

भारत की बेटी पुरस्कार

Bharat ki Beti Award 2026

🎧 LIVE FM RADIO




🔊 Volume