Top News

मोशी दुर्घटनेतील गंभीर जखमी रुग्णावर मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार

 पुणे, २९ जुलै २०२६ : मोशी येथील कचरा डेपो परिसरातील इमारत कोसळण्याच्या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या ३६ वर्षीय महेश चंद्रकांत राऊत यांच्यावर मेडिकव्हर हॉस्पिटल, भोसरी येथे अत्याधुनिक मल्टिडिसिप्लिनरी ट्रॉमा केअरच्या माध्यमातून यशस्वी उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

९ जुलै रोजी पहाटे महेश राऊत यांना मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दुर्घटनेत त्यांच्या डाव्या मांडीवर मोठी उघडी जखम, डोक्यावर आणि कपाळावर गंभीर जखमा व कवटीला फ्रॅक्चर, डाव्या हातातील टेंडनला दुखापत तसेच कमरेच्या मणक्याला (L5) फ्रॅक्चर अशा अनेक गंभीर दुखापती झाल्या होत्या.


रुग्णालयात दाखल होताच ऑर्थोपेडिक्स, प्लास्टिक व रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी, न्युरोसर्जरी, क्रिटिकल केअर, नेफ्रॉलॉजी, इंटरनल मेडिसिन आणि सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी या विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने तातडीने उपचार सुरू केले.

डॉ. राहुल दुला गागरे आणि डॉ. दीपक सदाशिव पाटील यांच्या नेतृत्वाखाली रुग्णावर टप्प्याटप्प्याने अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये जखमेची स्वच्छता (डेब्रायडमेंट), व्हॅक्यूम-असिस्टेड क्लोजर (VAC) थेरपी, बायोडिग्रेडेबल टेम्पोरायझिंग मॅट्रिक्स (BTM) द्वारे मऊ ऊतींची पुनर्बांधणी, डाव्या हातातील टेंडन दुरुस्ती, शरीरातील काचेचे तुकडे काढणे तसेच डोके, चेहरा आणि मानेवरील जखमांवर उपचार करण्यात आले.

त्यानंतर अतिदक्षता विभागात (ICU) सतत निरीक्षण, रक्त संक्रमण आणि विविध तज्ज्ञांच्या समन्वित उपचारांमुळे रुग्णाची प्रकृती हळूहळू सुधारली. प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना वॉर्डमध्ये हलविण्यात आले असून सध्या फिजिओथेरपी आणि पुनर्वसन उपचार सुरू आहेत.


याबाबत बोलताना डॉ. राहुल दुला, ऑर्थोपेडिक सर्जन, म्हणाले, “रुग्णाच्या हाडे, स्नायू, टेंडन आणि मऊ ऊतींना गंभीर दुखापत झाली होती. वेळेवर करण्यात आलेले ट्रॉमा मूल्यांकन, समन्वित शस्त्रक्रिया आणि विविध तज्ज्ञांच्या संयुक्त उपचारांमुळे रुग्णाचा जीव वाचविण्यासह त्याच्या पुनर्वसनालाही मोठी मदत झाली.”

डॉ. दीपक सदाशिव पाटील, प्लास्टिक आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जन, म्हणाले, “रुग्णाच्या मऊ ऊतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. VAC थेरपी आणि BTM सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जखमेची प्रभावी पुनर्बांधणी करण्यात आली. त्यामुळे जखम भरून येण्याची प्रक्रिया अधिक चांगली झाली असून रुग्णाच्या दीर्घकालीन कार्यक्षमतेसाठी हे उपचार महत्त्वाचे ठरतील.”

यावेळी महेश राऊत यांनी मेडिकव्हर हॉस्पिटलमधील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानत, “वेळेवर उपचार, डॉक्टरांचे कौशल्य आणि संपूर्ण टीमच्या अथक प्रयत्नांमुळे मला नवजीवन मिळाले. मी सर्वांचा मनापासून ऋणी आहे,” अशी भावना व्यक्त केली.

मेडिकव्हर हॉस्पिटल अत्याधुनिक ट्रॉमा, आपत्कालीन आणि पुनर्वसन सेवा उपलब्ध करून गंभीर जखमी रुग्णांना सर्वसमावेशक उपचार देण्यासा

ठी कटिबद्ध आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
Media World News

भारत की बेटी पुरस्कार

Bharat ki Beti Award 2026

🎧 LIVE FM RADIO




🔊 Volume