Top News

डॉ. नीलम गोऱ्हे यांची शिवसेनेच्या राष्ट्रीय सचिव श्रीमती शायना एन. सी. व श्रीमती. श्रेया योगेश कदम सदिच्छा भेट; संघटनात्मक प्रश्नांवर चर्चा

 पुणे. दि१९ : शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील सिल्व्हर रॉक्स निवासस्थानी आज शिवसेनेच्या राष्ट्रीय सचिव व प्रवक्त्या श्रीमती. शायना एन. सी. तसेच श्रीमती. श्रेया योगेश कदम यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी शाल, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला.

या भेटीदरम्यान शिवसेनेच्या संघटनात्मक बळकटीकरणाबाबत सविस्तर चर्चा झाली. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांचे वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन आणि पक्षविस्ताराच्या दृष्टीने पुढील वाटचाल यावर सकारात्मक विचारविनिमय करण्यात आला. 


याशिवाय पुणे शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी सामाजिक संस्थांचा सहभाग वाढविण्याची आवश्यकता, तसेच शहरातील बंद पडलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पांचा समाजोपयोगी पद्धतीने वापर करण्याबाबतही चर्चा झाली. पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये स्वयंसेवी संस्थांची भूमिका अधिक सक्षम करण्यासंदर्भात विविध सूचना यावेळी मांडण्यात आल्या.


या प्रसंगी राष्ट्रीय सचिव व प्रवक्त्या श्रीमती. शायना एन. सी., श्रीमती श्रेया योगेश कदम, श्रीमती पूजा रावेतकर, श्रीमती कांताताई पांढरे, श्रीमती रंजना कुलकर्णी, श्रीमती सोनाली लांडगे, श्रीमती भारती जोशी, श्री. महेंद्र जोशी, जायंट्स संस्थेचे डॉ. श्री. कैलास बवले, श्री. गणेश शिरोडे आणि श्री. धनंजय लोखंडे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
Media World News

भारत की बेटी पुरस्कार

Bharat ki Beti Award 2026

🎧 LIVE FM RADIO




🔊 Volume