Top News

ॲग्रिकल्चरल कॉलेज फार्म को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या १११ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

 पुणे, दि. १३ ऑगस्ट २०२६ : ॲग्रिकल्चरल कॉलेज फार्म को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, लि. पुणे- यांची १११ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि. १३ ऑगस्ट) कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर येथील शिरनामे सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री. सुनिल आलम होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुभाष भालेकर आणि सहयोगी संशोधन संचालक, विभागीय कृषी संशोधन प्रकल्प डॉ. दत्तात्रय लाड उपस्थित होते. सोबतच कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष श्री. पद्मनाथ गरसुळे, सचिव सुवर्णा टिळेकर, संचालक श्री. श्रीकृष्ण सावंत, श्री. अशोक पाटील, सौ. कल्पना वाकळे सौ. वैशाली पावले, राजू बामगुडे, संजय अवचीते, डॉ. नरेंद्र काशीद, श्री .नितीन शेळके, श्री अशोक पाटील, श्री.अभिजीत मांढरे, सय्यद निसार, श्री. ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यासह अन्य पदाधिकारी सभासद व कर्मचारी उपस्थित होते. 


यावेळी मान्यवरांच्या हस्ते दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, शालेय वस्तू, गुलाब पुष्प देऊन कौतुक करण्यात आले, सोबतच सेवानिवृत्त सभासदांचा शाल, शिफळ, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या युवक युवतींचा देखील गौरव या कार्यक्रमात करण्यात आला.

प्रास्ताविक भाषणात संस्थेच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा संचालक श्रीकृष्ण एस. सावंत सर यांनी उपस्थितांसमोर मांडला. अध्यक्षीय मनोगतात श्री. सुनिल आलम यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी पदाधिकारी, संचालक, सभासद आणि कर्मचारी यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. भविष्यातही सभासदांच्या हिताला प्राधान्य देत संस्थेच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.


प्रमुख पाहुणे डॉ. दत्तात्रय लाड आणि डॉ. सुभाष भालेकर यांनी मार्गदर्शन करताना संस्थेच्या माध्यमातून होत असलेली कामे आणि पारदर्शक व्यवहाराचे कौतुक केले. कमी सभासद असताना देखील उत्तम व्यवहार आणि मदतीची हमी देणारी हक्काची संस्था पाठीशी असण्याचा अभिमान व्यक्त केला. 

सदर सभेचे सूत्रसंचालन व आभार निवेदक गणेश मोढवे यांनी मानले.


Post a Comment

Previous Post Next Post
Media World News

भारत की बेटी पुरस्कार

Bharat ki Beti Award 2026

🎧 LIVE FM RADIO




🔊 Volume