Top News

श्रावण सोहळा व प्रेरणा पुरस्कार २०२६ येत्या शुक्रवारी

 पुणे : गुरूकुल एज्युकेशन फाऊंडेशनच्या वतीने ‘प्रेरणा – The Motivation’ अंतर्गत ‘श्रावण सोहळा आणि प्रेरणा पुरस्कार २०२६’ या भव्य सोहळ्याचे आयोजन शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, पद्मावती, पुणे येथे करण्यात आले आहे. या सोहळ्याचे हे पाचवे पर्व असून, यंदाची संकल्पना 'शिवशक्ती- एक दिव्य अनुभूती...’ अशी आहे. सोबतच समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून इतरांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या व्यक्तिमत्त्वांचा यावेळी ‘प्रेरणा पुरस्कार २०२६’ देऊन सन्मान करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम फक्त महिलांसाठी असून हा सर्वथा विनामूल्य असल्याचे सोहळ्याच्या मुख्य आयोजिका सौ. शारदा दातीर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कृत्तिका डहाळे, नीना तांबे, विशाखा राऊत, शितल कुडले, भावना राजीवडे आदी उपस्थित होते. 


यंदाच्या सोहळ्यात आदिवासी महिलांचा विशेष सांस्कृतिक परफॉर्मन्स हे प्रमुख आकर्षण असणार आहे. तसेच ‘I am प्रेरणा फॅशन शो’च्या माध्यमातून कला, संस्कृती आणि आत्मविश्वासाचा अनोखा संगम अनुभवता येणार आहे.

श्रावण महिन्याच्या भक्तिमय वातावरणाला साजेशा मनोरंजनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीही उपस्थितांना अनुभवता येणार आहे. याशिवाय लकी ड्रॉच्या माध्यमातून भरघोस बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी उपस्थितांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. समाजातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा गौरव, महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ यामुळे ‘श्रावण सोहळा आणि प्रेरणा पुरस्कार २०२६’ हा सोहळा पुणेकरांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे अश्या भावना शारदा दातीर यांनी व्यक्त केल्या.


यावर्षीच्या पुरस्कारामध्ये सौ. शितल नितीन कुडले, सौ. विजया ज्ञानेश्वर सोळस्कर आणि सौ. प्रतिमा प्रकाश जगताप यांना प्रेरणा पुरस्कार २०२६ तर सौ. अनिता क्षीरसागर, सौ. रूपाली राजेश जाधव आणि श्रीमती. सुनीता अशोक तारु यांना प्रेरणा बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड प्रदान करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post
Media World News

भारत की बेटी पुरस्कार

Bharat ki Beti Award 2026

🎧 LIVE FM RADIO




🔊 Volume