Top News

युवा लेखक श्लोक नाईक यांच्या मराठी पुस्तकांचे भव्य प्रकाशन

 पुणे : युवा लेखक श्लोक नाईक यांच्या दोन मराठी पुस्तकांचा भव्य प्रकाशन सोहळा रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. ‘एक आशादायक शेवट’ आणि ‘जेव्हा मनाला शब्द सापडतात’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या दोन्ही पुस्तकांचे वैशिष्ट्य म्हणजे श्लोक नाईक यांच्या यापूर्वी प्रकाशित झालेल्या इंग्रजी पुस्तकांची मराठी भाषांतरे आहेत. त्यांच्या इंग्रजी पुस्तकांना भारतासह लंडन आणि जर्मनीमध्येही वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, त्यांच्या साहित्याला देश-विदेशात मिळालेले यश उल्लेखनीय ठरले आहे. 


नगरसेवक अजय खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक श्री. बबन पोतदार, श्री. नामदेव मालवडे, देवकर सर आणि श्री. गणेश कल्याणकर सर यांच्यासह साहित्य, शिक्षण व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

अल्पवयातच लेखन क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या श्लोक नाईक यांच्या साहित्यिक प्रवासातील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. इंग्रजी भाषेतून सुरू झालेला त्यांचा साहित्यिक प्रवास आता मराठी वाचकांपर्यंत पोहोचत आहे. त्यांच्या साहित्यकृतींना भारतासह परदेशातही मिळणारा प्रतिसाद त्यांच्या लेखनाची व्यापक पोहोच अधोरेखित करणारा आहे.


‘एक आशादायक शेवट’ आणि ‘जेव्हा मनाला शब्द सापडतात’ या दोन्ही पुस्तकांमधून श्लोक नाईक यांच्या लेखनातील संवेदनशीलता, विचारांची मांडणी आणि शब्दांशी असलेले नाते वाचकांसमोर येत असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले. युवा वयात साहित्य क्षेत्रात सातत्याने लेखन करत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या श्लोक नाईक यांना त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

या प्रकाशन सोहळ्यामुळे श्लोक नाईक यांच्या साहित्यिक प्रवासाला नवी दिशा मिळाली असून, त्यांच्या मराठी पुस्तकांनाही वाचकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post
Media World News

भारत की बेटी पुरस्कार

Bharat ki Beti Award 2026

🎧 LIVE FM RADIO




🔊 Volume