Top News

फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंग्जतर्फे पत्रकारांना रेनकोटचे वितरण

 पुणे : सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंग्जतर्फे पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सदस्यांना पावसाळ्यात उपयुक्त ठरणाऱ्या दर्जेदार रेनकोटचे वितरण करण्यात आले. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश शेळके, सरचिटणीस हिरा सरवदे, फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंग्जचे पदाधिकारी अनिरुद्ध सरनाईक, प्रवीणकुमार सिंह, तुषार गुप्ता व मुकुल माधव फाउंडेशनचे समन्वयक सचिन कुलकर्णी आदी उपस्थित होते.


पत्रकारांना कोणत्याही परिस्थितीत घटनास्थळी जाऊन वार्तांकन करावे लागते. विशेषतः पावसाळ्यात प्रतिकूल हवामानाचा सामना करत आपली जबाबदारी पार पाडावी लागते. अशावेळी फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंग्जने दिलेले रेनकोट पत्रकारांच्या दैनंदिन कामात उपयुक्त ठरणार असल्याची भावना उमेश शेळके यांनी व्यक्त केली. उद्योग क्षेत्राबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून संस्था विविध उपक्रम राबवत असून, पत्रकारांसाठी केलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.


लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार समाजाच्या चांगल्यासाठी अहोरात्र झटत असतो. ऊन, वारा, पाऊस याची तमा न करता प्रतिकूल परिस्थितीतही आपले कर्तव्य बजावत असतो. पावसाळ्यात त्यांना संरक्षणासाठी रेनकोट उपयोगी पडतील, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. पत्रकार कल्याणासाठी फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंग्ज यापुढेही सहकार्य करीत राहील, अशी भावना सरनाईक व कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post
Media World News

भारत की बेटी पुरस्कार

Bharat ki Beti Award 2026

🎧 LIVE FM RADIO




🔊 Volume