Pune संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने पुण्यात मुक्कामी आलेल्या वारकरी भाविकांसाठी कृष्णाई युवा मंचच्या वतीने सेवा उपक्रम राबविण्यात आला. रास्ता पेठ येथे आयोजित या उपक्रमात वारकऱ्यांना प्लास्टिक घोंगडी, तेल, झंडू बाम, साबण, कोलगेट टूथपेस्ट, पाण्याच्या बाटल्या, बिस्किटे तसेच मसाला डोसा यांचे मोफत वाटप करण्यात आले.
या सेवा उपक्रमाचे उद्घाटन माजी आमदार मोहनदादा जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन कृष्णाई युवा मंचचे संस्थापक-अध्यक्ष व उद्योजक उदय मोहिते यांनी केले.
यावेळी माजी नगरसेवक अजय भोसले, अरुण धारवे, बापू खरात, देवयानी मोहिते, मनीषा राऊत, सरिता भाताडे, डिंपल अगरवाल, धनश्री गुजर, अश्विन ठाकूर, योगेश राऊत, गणेश दरडिगे, अजय मोरे, महेश गुजरे, ओंकार खोले, मोहसीन खान, प्रज्वल राऊत, तुषार कांबळे, शिवकुमार अय्यर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी वारकरी संप्रदायाच्या सेवेला सर्वोच्च स्थान असल्याचे सांगत, अशा सेवा उपक्रमांमुळे समाजात सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होत असल्याची भावना व्यक्त केली.

Post a Comment